हर्षवर्धन सपकाळ : काँग्रेसचा नवा आत्मविश्वास

काँग्रेस पक्षाची स्थापना मुंबईत झाली, महाराष्ट्र हे पुरोगामी विचाराचे राज्य
असून काँग्रेसचा विचार खोलपर्यंत रुजलेले राज्य आहे. २०१४ पर्यंत, केंद्रात व
राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते व काँग्रेसची संघटनाही गावपातळीपर्यंत
मजबूत होती पण २०२४ नंतर राज्यातील राजकीय चित्र बदलले व भारतीय
जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला व काँग्रेस पक्षाची घरसण होत
गेली, ती आजपर्यत सुरुच आहे. २०१४ नंतर काँग्रेसची केंद्रात व राज्यातही
सत्ता नसल्याने व दुसरीकडे भाजपाच्या दडपशाही, ईडी, सीबीआयच्या
कारवाईच्या भितीमुळे काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला. सत्ता नसताना
पक्ष चालवणे कठीण काम असते. दिल्ली ते गल्ली पर्यंत काँग्रेसचा बोलबाला
होता पण आता त्याच काँग्रेस पक्षाचे विधानसभेत फक्त १६ आमदार आहेत.
काँग्रेसकडे विरोधी पक्षनेते पद वा कोणतेही संवैधानिक पद नाही आणि
वर्षानुवर्षे काँग्रेसची पदे घेऊन आपले राजकारण केले त्यांनी काँग्रेस पक्षाची साथ
सोडलेली आहे….अशा कठीण परिस्थितीत हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे
काँग्रेसचे नेतृत्व आलेले आहे.

फेब्रुवारी २०२५ मध्ये हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष पदी
नियुक्ती झाली, त्यावेळी ‘कोण हे हर्षवर्धन सपकाळ’? असाच प्रश्न अनेकांना
पडला होता आणि हे खरेही आहे, कारण प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा होईपर्यंत
महाराष्ट्रातील जनतेला ते फारसे परिचित नव्हते. हर्षवर्दन सपकाळ यांनी राष्ट्रीय
पातळीवर काँग्रेस पक्षाचे काम केलेले आहे, गुजरात व मध्य प्रदेशमध्ये पक्ष
संघटना वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे, २०१७ च्या विधानसभा
निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाने चांगली कामगिरी केली, आणखी १०-
१५ जागी विजय मिळाला असता तर काँग्रेसची सत्ता आली असती, त्यानंतर
मध्य प्रदेशमध्ये त्यांनी संघटनात्मक काम केले व काँग्रेसची सत्ता आली, त्यात
त्यांचेही योगदान आहे हे नाकारुन चालणार नाही. राजीव गांधी पंचायत राज
विभागाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी देशभर काम केले आहे. त्याआधी ते बुलढाणा
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते व आमदार म्हणूनही त्यांनी काम केले आहे पण
महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदी त्यांची नियुक्ती झाल्याने

Page 2 of 2
आश्चर्य वाटणे साहजिक आहे. आज त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाला एक वर्ष पूर्ण झाले
आहे, या एका वर्षात हर्षवर्धन सपकाळ कोण? हे त्यांनी त्यांच्या कामातून
राज्याला दाखवून दिले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुरुवातीला
बीड जिल्ह्यात सद्भावना यात्रा काढून संतोष देशमुख हत्येनंतर बीड जिल्ह्यात
निर्माण झालेल्या सामाजिक तणावात सौहार्द निर्माण करण्यासाठी मोठे पाऊल
उचलले, त्यानंतर परभणीतही सद्भावना पदयात्रा काढून सामाजिक शांतता
प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला. पदयात्रेचा हा प्रवास पुढे नागपूर,
नाशिक या शहरातही पोहचला. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय लष्कराच्या
पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश देत तिरंगा यात्रा काढली. भाजपा
सरकारच्या विरोधात विविध आंदोलने करून सरकारच्या विरोधात रस्त्यावर
उतरून आंदोलने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असताना
हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांच्या
साथीने नागपूरच्या दिक्षाभूमी ते सेवाग्राम अशी संविधान बचाव पदयात्रा काढून
रा. स्व. संघाला संविधान व गांधी विचार स्विकारण्याचे आवाहन केले. या सर्व
पदयात्रांना जनतेचा दांडगा प्रतिसाद मिळाला. याकाळात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या
पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे कामही त्यांनी केले, अहिल्यानगर जिल्ह्यात
काँग्रेस जिल्हाध्यक्षाला मारहाणीची घटना असो वा कल्याणमध्ये मामा पगारे
यांना भाजपाच्या लोकांनी दिलेली अपमानास्पद वागणूक असो, स्वतः जातीने
त्याची दखल घेत त्यांची भेट घेऊन राहुल गांधी यांचा ‘डरो मत’ चा संदेश
दिला.

२०२५ या वर्षात राज्यात नगरपालिका, महानगरपालिका व १२ जिल्हा
परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने
राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून विजय मिळवला. स्थानिक स्वराज्य
संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात हे सुत्र घेऊन
स्वबळावर लढण्याचा निर्णय हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतला, पण स्थानिक
पातळीवर जर आघाडी करायची असेल तर तसा निर्णय घेण्याच्या सुचनाही
दिल्या. याच दरम्यान हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षासोबत नवे मित्र
जोडले. महाराष्ट्रातील काँग्रेसचे राजकारण अनेक वर्षे एका ठरावीक चौकटीत

Page 3 of 2
अडकलेले होते. आघाड्यांचा भाग असतानाही काँग्रेस पक्षाची भूमिका बहुतेक
वेळा दुय्यम राहिली. शरद पवारा यांची राजकीय छाया आणि उद्धव ठाकरे
यांच्या प्रभावाखाली काँग्रेस पक्ष काम करत असल्याची भावना वाढीस लागली
होती पण हर्षवर्धन सपकाळ यांनी हे चित्र बदलले. काँग्रेसला युतीतील एक घटक
पक्ष या चौकटीतून बाहेर काढण्याचे काम त्यांनी केले आहे. काँग्रेसची वैचारिक
ओळख, संघटनात्मक ताकद आणि सामाजिक आधार पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न
करत ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी
बरोबर आघाडी केली, त्याचबरोबर महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष व
प्रकाश शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन आघाडीला बरोबर घेऊन सोशल
इंजिनिअरिंग करुन दाखवले. उद्धव व राज ठाकरे या बंधूंची युती आणि पवार
काका–पुतण्यांनी काही ठिकाणी एकत्र येत राजकीय गणिते जुळवून काँग्रेसची
कोंडी करण्याचा, काँग्रेसला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला मात्र हर्षवर्धन सपकाळ
यांनी या दबावासमोर न झुकता वेगळी दिशा निवडली. प्रकाश आंबेडकर,
महादेव जानकर, प्रकाश शेंडगे यांच्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन, नवी
सामाजिक व राजकीय समीकरणे उभी करून काँग्रेस स्वतःच्या ताकदीवर पुढे
जाऊ शकते हा संदेश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.

वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांच्याशी थेट संवाद
साधण्याचा निर्णय हा केवळ निवडणूक गणिताचा भाग नाही, तर व्यक्ती-केंद्रित
राजकारणाला छेद देणारा वैचारिक निर्णय आहे. शरद पवार केंद्रित राजकीय
चौकटीपासून काहीसे दूर जात, तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रभावाखाली
राहण्याऐवजी स्वतंत्र वाट निवडण्याचा हा प्रयत्न काँग्रेससाठी धाडसी आहे. या
नव्या राजकीय मांडणीतून मराठा, ओबीसी, दलित आणि पारंपरिक मुस्लिम
समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी राजकीय
परंपरेत या सामाजिक घटकांनी नेहमीच निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र
अलीकडच्या काळात हेच घटक अस्वस्थ, विखुरलेले आणि राजकीयदृष्ट्या
दुर्लक्षित झाल्याची भावना व्यक्त करत होते. काँग्रेसची ही नवी दिशा त्या
अस्वस्थतेला राजकीय आवाज देण्याचा प्रयत्न करते.

एका वर्षातच हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली
आहे. त्यांच्या नेतृत्वाला पुढील काळात आणखी धार येईल व महाराष्ट्रात ते

Page 4 of 2
काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देतील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये
आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निकालाने ते अनेक अर्थाने
सिद्ध करूनही दाखवले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या यशाची घौडदौड अशीच
कायम राहू, याच वर्षपूर्तीनिमित्त शुभेच्छा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *