शेतकरी विरोधी महायुती सरकारचा जाहीर निषेध!

कोकणच्या लाल मातीत घाम गाळून आंबा-काजू पिकवणाऱ्या बळीराजाचे अवकाळी पावसाने कंबरडे मोडले आहे. हेक्टरी ५ लाख (आंबा) आणि ३ लाख (काजू) मदतीची मागणी ही शेतकऱ्यांची भीक नसून तो त्यांचा हक्क आहे! खुद्द सरकारी अधिकाऱ्यांनी नुकसानीचे शिक्कामोर्तब करून शिफारस केली असतानाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही मदत देण्यास टाळाटाळ करून कोकणच्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करत आहेत.

या जुलमी प्रशासनाच्या विरोधात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज मुंबईत रणशिंग फुंकले गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते श्री. राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री. महादेव जानकर, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील आणि शिवसेनेचे नेते खा. अरविंद सावंत, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख प्रा. दिपक पवार यांच्या नेतृत्वात गिरगांव चौपाटी पासून मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानावर विराट आणि आक्रमक मोर्चा काढण्यात आला.

पोलीसी बळाचा गैरवापर करून तुम्ही कितीही शेतकऱ्यांचा , शेतकरी हीताचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कांसाठीचा हा लढा थांबणार नाही, तुम्ही थांबवू शकणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *