अमरावती जिल्ह्यातील मेळघाट

new111

 

अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा निसर्गरम्य असला तरी अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. येथील अनेक आदिवासी बांधवांचा बाहेरील जगाशी फारसा संपर्क येत नाही. अशा परिस्थितीत या बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांना देशाच्या लोकशाहीचे मंदिर पाहता यावे, यासाठी अमरावती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्री. बळवंत वानखेडे यांनी पुढाकार घेतला.
 
या दौऱ्यादरम्यान काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस तथा खासदार प्रियंकाजी गांधी आणि संघटन सरचिटणीस खासदार के.सी. वेणुगोपाल यांच्याशी आदिवासी बांधवांची भेट झाली. यावेळी आदिवासी बांधवांनी आपल्या समस्या आणि कॉंग्रेस पक्षाबद्दलचे प्रेम दोन्ही या नेत्यांसमोर व्यक्त केले. इतक्या मोठ्या नेत्यांना समोर पाहून आणि संसद भवन पाहून उपस्थितांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला.
 
new333
या ऐतिहासिक दिल्ली दौऱ्यात आणि संसद भेटीदरम्यान अमरावती जिल्हा परिषद माजी सभापती दयारामजी काळे, चिखलदरा काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष सहदेव बेलकर, धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राहुल येवले, चिखलदरा अनु. जाती काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मेहपतसिंग उईके, संजयभाऊ बेलकर, राजेशभाऊ सेमलकर, मेळघाट विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पियुष मालवीय तसेच चिखलदरा काँग्रेस कमिटीचे इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
हा उपक्रम केवळ एक सहल नसून, दुर्गम भागातील जनतेला देशाच्या सर्वोच्च सभागृहाची ओळख करून देणारा एक सामाजिक पूल ठरला आहे.
 
 

Add Your Heading Text Here