जळगाव जामोद नगर परिषद

Untitled design
जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीला बुलढाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे, प्रदेश सरचिटणीस मा. रामविजय बुरुंगुले, पक्षनेत्या स्वाती वाकेकर, मा. प्रकाश पाटील, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. मोहतेश्याम रझा, मा. संजय बोडखे, मा. अशोक इंगळे यांच्यासह इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.